
भारत आणि इंग्लंड संघात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या चारही सामने पूर्ण ५ दिवस खेळवण्यात आले आहेत. या मालिकेत ४ सामन्यांनंतर इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतलेली आहे. या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर ३१ जुलैपासून सुरू होणार आहे.
या सामन्यात भारताला मालिका वाचवण्यासाठी विजय मिळवणे गरजेचे आहे. जर हा सामना पराभूत झाला किंवा अनिर्णित जरी राहिला, तरी इंग्लंड मालिका जिंकेल. भारताने मालिका विजयाची संधी गमावली आहे. पण आता किमान बरोबरी साधण्याची अपेक्षा त्यांना आहे.