भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुली याने भारताने पाकिस्तानशी सर्व क्रिकेट संबंध तोडावेत असे मत व्यक्त केले. India vs Pakistan यांच्यात द्विदेशीय मालिका होत नसली तरी हे संघ आयसीसीच्या वन डे, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया चषक आदी स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळतात. कोलकात्यात एएनआयशी बोलताना गांगुली म्हणाला, "शंभर टक्के,पाकिस्तानशी संबंध तोडायलाच हवेत. कठोर कारवाई आवश्यक आहे. दरवर्षी अशा घटना घडणे ही बाब गंभीर आहे. दहशतवाद खपवून घेतला जाऊ शकत नाही."