Bangladesh Test Cricket TeamSakal
Cricket
PAK vs BAN, 1st Test: बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! यजमानांना त्यांच्याच घरात पाजलं पराभवाचं पाणी
Pakistan vs Bangladesh, 1st test: बांगलादेशने पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेतही आघाडी घेतली.
Bangladesh first-ever Test victory over Pakistan: बांगलादेशने पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्या १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
हा बांगलादेशचा पाकिस्तानविरुद्ध मिळवलेला पहिलाच कसोटी विजय ठरला. यापूर्वी खेळलेल्या १३ कसोटीतील १२ सामन्यांत त्यांना पाकिस्तानविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता. पण अखेर बांगलादेशने पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला आहे.
या सामन्यात पाकिस्तानला दुसऱ्या डावात विजयासाठी बांगलादेशसमोर ३० धावांचेच लक्ष्य ठेवता आले होते. हे लक्ष्य बांगलादेशने ६.३ षटकात पूर्ण केले. बांगलादेशकडून झाकिर हसन १५ धावांवर नाबाद राहिला, तर शादमन अस्लम ९ धावांवर नाबाद राहिला.