Pakistan’s semi-final chances hit hard after washout against England
esakal
Cricket
Pakistan Semi Final Scenario WC: पाकिस्तानची 'नौका' श्रीलंकेतच बुडणार! उपांत्य फेरी सोडाच, हे तर तालिकेत तळावरच राहणार
Pakistan semi-final qualification scenario : महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ मध्ये पाकिस्तान संघाची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. इंग्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत.
How can Pakistan qualify for Women’s ODI World Cup 2025 semi-finals? पाकिस्तान महिला संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात येईल अशी शक्यता आहे. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातला कालचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण मिळाले. यामुळे पाकिस्तानचा संघ अजूनही तळावर आहे आणि त्यांना चार सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यांचे अजूनही तीन सामने आहेत आणि इतरांवर सर्व भीस्त आहे.
