Salman Agha and coach Mike Hesson were seen in a tense exchange during the PAK vs NAM clash
esakal
Why Salman Agha argued with Mike Hesson PAK vs NAM: पाकिस्तानच्या संघात सर्वकाही सुरळित नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी हवी तशी झालेली नाही. स्पर्धेतील आव्हान टीकवण्यासाठी त्यांना नामिबियाविरुद्ध विजय मिळवावा लागणार आहे. साहिबजादा फरहानच्या शतकाच्या जोरावर त्यांनी नामिबियासमोर २०० धावांचे लक्ष्य उभे केले. पण, या सामन्यात कर्णधार सलमान आघा आणि मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शेजारीच बाबर आजम बसून हे सर्व शांत बसून पाहताना दिसतोय...