Pakistan thrash Oman despite Afridi’s expensive spell
esakal
Asia Cup 2025 Pakistan vs Oman Live Marathi Update: पाकिस्तानने आशिया चषक २०२५ स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. ओमानविरुद्ध त्यांच्या फलंदाजांची भंबेरी उडाली, पण त्यांनी १६० धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला आणि ओमानला ६७ धावांवर गुंडाळले. या सामन्यात ओमानच्या आघाडीच्या फलंदाजांनी पाकिस्तानचा नंबर १ गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या एका षटकात १७ धावा चोपून सर्वांना आश्चर्यचकित केले.