PAK vs SL 2nd Test: श्रीलंकेचे लोटांगण, पाकिस्तानने ९८ धावांवर गुंडाळले... ८ फलंदाज एकेरी धावसंख्येत गडगडले

Pakistan bowlers dismiss Sri Lanka for 98 in second Test: पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान संघाच्या वेगवान गोलंदाजांनी अक्षरशः धुमाकूळ घातला.
Pakistan bowlers dismiss Sri Lanka for 98 in second Test

Pakistan bowlers dismiss Sri Lanka for 98 in second Test

Updated on: 

Sri Lanka all out for 98 against Pakistan in Rawalpindi: पाकिस्तानी गोलंदाजांनी दुसऱ्या कसोटीत अक्षरशः धुमाकूळ घातला... मोहम्मद अब्बास, रझउल्लाह आणि आमेर जमाल यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेताना श्रीलंकेचा पहिला डाव ९८ धावांवर गुंडाळला. रावळपिंडी येथे सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी अगदी योग्य ठरवला. श्रीलंकेच्या फलंदाजांना पाकिस्तानी गोलंदाजांच्या वेगवान माऱ्याचा सामना करता आला नाही. तब्बल आठ फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.

Loading content, please wait...