Pakistan could still boycott the T20 World Cup 2026 despite announcing their squad
esakal
PCB chief Mohsin Naqvi statement on T20 World Cup: पाकिस्तान क्रिकेट संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळायचे की नाही, हे अद्याप ठरलेले नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेसाठी नुकताच त्यांचा १५ सदस्यीय संघ जाहीर केला. पण, संघ जाहीर केला म्हणून आम्ही वर्ल्ड कप खेळूच, असा अर्थ काढू नका, असे विधान पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी केले आहे. पाकिस्तानने अद्याप त्यांच्या सहभागाची पुष्टी केलेली नाही आणि पुढील महिन्यात श्रीलंकेला जाण्याबाबत निर्णय घेण्यापूर्वी बोर्ड पाकिस्तान सरकारच्या निर्देशाची वाट पाहत आहे.