

Dasun Shanaka.
Sakal
Pakistan Win Last-Ball Thriller against Sri Lanka: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत शनिवारी पाल्लेकेले येथे पाकिस्तानने श्रीलंकेला ५ धावांनी पराभूत केले. मात्र विजयानंतरही त्यांचे आव्हान संपले आहे. त्यांना सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी ६५ हून अधिक धावांनी विजयाची गरज होती, तरच ते न्यूझीलंडचा नेट रन रेट मागे टाकू शकले असते. मात्र तसं न झाल्याने पाकिस्तानचा स्वप्नभंग झाला आणि न्यूझीलंड सेमीफायनलासाठी पात्र ठरले.
शनिवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला (PAK vs SL) २१३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला २० षटकात ६ बाद २०७ धावाच करता आल्या. श्रीलंकेकडून पवन रत्ननायके (Pavan Rathnayake) आणि कर्णधार दसून शनका (Dasun Shanaka) यांनी अर्धशतके करत झुंज दिली, पण त्यांना श्रीलंकेला विजयापर्यंत पोहचवता आले नाही.