

Jasprit Bumrah
Sakal
नुकत्याच झालेल्या टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत जसप्रीत बुमराहने त्याच्या स्लोअर बॉल्सने सर्वांनांच प्रभावित केले होते. त्याने या स्पर्धेत १४ विकेट्स घेतल्या. दरम्यान, पाकिस्तानी वंशाचा युएईमधील गोलंदाज झहुर खान याने दावा केला आहे की बुमराहला स्लोअर बॉल्स त्याने शिकवले.
त्याने म्हटले की २०२० आयपीएल (IPL) दरम्यान त्याने बुमराहला (Jasprit Bumrah) त्याची शैली न बदलता स्लोअर बॉल्स टाकायला शिकवले. त्यावेळी दुबईत झालेल्या आयपीएलच्या लेगदरम्यान तो मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) नेट गोलंदाज होता. मात्र, त्याने जो दावा केला आहे, त्याबाबत सध्या कोणतेही पुरावे नाहीत.