Sameer Minhas fastest Youth ODI century record vs Zimbabwe
esakal
Sameer Minhas century vs Zimbabwe youth : पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील संघातील फलंदाज समीर मिन्हास याने झिम्बाब्वेविरुद्धच्या वन डे सामन्यात खणखणीत शतक झळकावले. युवा वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यातील हे सर्वात वेगवान शतक असल्याचा दावा पाकड्यांकडून केला जात आहे. तिरंगी मालिकेतील फायनलमध्ये झिम्बाब्वेच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध मिन्हासने ४२ चेंडूंत शतक पूर्ण केले. हरारे येथे झालेला हा सामना पाकिस्तानने जिंकला आणि १८ वर्षीय मिन्हासने भारताच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा ( Vaibhav Suryavanshi Record) मोडल्याचा दावा होऊ लागला.