

PCB to Auction Multan Sultans
Sakal
PCB Invites Bids for Multan Sultans: पाकिस्तान क्रिकेटमध्ये अनेक मोठ्या घडामोडी सध्या घडताना दिसत आहेत. भारतातील इंडियन प्रीमियर लीगची (IPL) स्पर्धा करण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आयपीएल २०२६ स्पर्धेदरम्यानच पाकिस्तान सुपर लीग २०२६ (PSL) स्पर्धाही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
२६ मार्चपासून पीएसएलच्या ११ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. पण असं असलं तरी पाकिस्तानला आधी अनेक समस्या सोडवायच्या आहेत. यातील मुख्य समस्या म्हणजे पीएसएलमधील मुलतान सुलतान (Multan Sultans) या संघाची मालकी.