Haris Rauf PCB : वर्कलोडचं नाटक करणाऱ्या हारिसला पासीबीने दिला दणका; कसोटीला नाक मुरडलं आता टी 20 लीग हातून गेली

Haris Rauf PCB Central Contract : हारिस रऊफ सोबतच पीसीबीने मोहम्मद हाफीजला देखील दिला नारळ
Haris Rauf
Haris Rauf

Haris Rauf PCB Central Contract : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यास नकार दिला होता. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हारिस रऊफला मोठा झटका दिला असून त्याचा करार रद्द केला आहे. तसेच त्याला 30 जून 2024 पर्यंत परदेशातील लीगमध्ये खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. पीसीबीने संघाचा संचालक मोहम्मद हाफीजला देखील पदावरून हटवलं आहे.

Haris Rauf
IND vs ENG : रोहित, रविंद्र अन् सर्फराज! पहिल्या दिवसाचे तीन हिरो, दोघांनी रचला पाया तर तिसऱ्याने कळस

पाकिस्तानचा कसोटी संघ नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार होता. त्यावेळी हारिस रऊफने वर्कलोडचं कारण देत या दौऱ्यातून माघार घेतली होती. ऐनवेळी रऊफने माघार घेतल्याने पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या महत्वाच्या मालिकेत अनुभवहीन गोलंदाजांसोबत मैदानात उतरावं लागलं. नसीम शाह देखील दुखापतग्रस्त होता. पाकिस्तानने ती कसोटी मालिका 3 - 0 अशी गमावली.

त्यावेळी निवडसमिती अध्यक्ष वहाब रियाज यांनी प्रतिक्रिया दिली होती की, 'रऊफने पहिल्यांदा होकार दिला. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेतली. तो आपला फिटनेस आणि वर्कलोड याबाबत चिंतेत होता. त्याच्या अनुपस्थितीमुळे संघाचा समतोल बिघडला आहे.'

Haris Rauf
Ind vs Eng 3rd Test Day 1 : जडेजाचे झुंजार शतक मात्र सर्फराजचा गेला बळी, पहिल्या दिवशी भारताच्या 5 बाद 326 धावा

या प्रकरणी पीसीबीने रऊफला 30 जानेवारी 2024 पर्यंत उत्तर देण्यास सांगितलं होतं. मात्र पीसीबी हारिस रऊफच्या उत्तरावर खूष नव्हती. रऊफने केंद्रीय कराराचं उल्लंघन केलं होतं. यानंतर त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. याचबरोबर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाचा संचालक मोहम्मद हाफीजला देखील पदावरून हटवलं.

पीसीबीने अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध करत सांगितलं की, 'पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुरूष संघाचे संचालक मोहम्मद हाफीज यांचे त्यांच्या योगदानाबद्दल आभार मानते. हाफीजने खेळाडूंना प्ररित केलं. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर त्याचा सल्ला महत्वपूर्ण होता. पीसीबी हाफीजला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देते.'

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com