

Pakistan Cricket Central Contracts 2026-27
esakal
Pakistan Cricket Central Contracts 2026-27: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आपल्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघासाठी २०२६-२७ या वर्षाचे नवे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केले आहेत. हे कॉन्ट्रॅक्ट ३० जून २०२७ पर्यंत लागू असणार आहेत. यंदा PCB ने गेल्या वर्षीची श्रेणीनुसार कॉन्ट्रॅक्ट देण्याची पद्धत बदलून फॉरमॅटनुसार नवी पद्धत लागू केली आहे.
या यादीत एकूण ३८ खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. तर गेल्या वर्षी कॉन्ट्रॅक्ट मिळालेल्या १३ खेळाडूंना यंदा बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. याशिवाय १९ खेळाडूंना डेव्हलपमेंट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं आहे.