

ENG vs PAK Mohammad Rizwan smiling after Pakistan defeat viral video
Sakal
पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात त्यांनी सपाटून मार खाल्ला असल्याने आता त्यांना व्हाईटवॉश टाळण्याचे आव्हान आहे.
इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानने लीड्सला झालेला पहिला सामना १०३ धावांनी तर लॉर्ड्सला झालेला दुसरा सामना १९४ धावांनी त्यांनी गमावला. त्यामुळे इंग्लंडने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. अशातच आता पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे.