Pakistan cricket downfall after beating India in 2021 T20 World Cup
esakal
Pakistan cricket downfall after beating India: पाकिस्तान क्रिकेट संघात सगळा सावळा गोंधळ सुरू आहे. इंग्लंड दौऱ्यावर दोन कसोटीत सपाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तान संघात होलसेल बदल केले गेले. सात खेळाडूंना घरचा रस्ता दाखवला गेला, तर मुख्य प्रशिक्षक सर्फराज अहमद आणि गोलंदाज प्रशिक्षक उमर गुल यांनाही मायदेशात पाठवले गेले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ( PCB) निर्णयावर टीका झाली आणि त्यात आता माजी खेळाडू मोहम्मद युसूफने ( Mohammad Yousuf ) अकलेचे तारे तोडले.