Pakistan team flying to Colombo for ICC T20 World Cup 2026
esakal
Mohsin Naqvi confirms Pakistan T20 World Cup participation? बांगलादेशच्या हकालपट्टीनंतर चवताळलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ( PCB) त्यांच्याच खेळाडूंनी चपराक दिल्याचे चित्र समोर आले आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून बहिष्काराची भाषा पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांनी केली आणि त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफ यांची भेट घेतली. शुक्रवारी किंवा सोमवारी पाकिस्तानच्या सहभागाचा निर्णय येणे अपेक्षित आहे, परंतु पाकिस्तान क्रिकेट संघाचा काही वेगळाच प्लान आहे. त्यांनी बोर्डाच्या विरोधात जाण्याचा पवित्रा घेतल्याचे चित्र दिसतंय.