
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा सध्या पाकिस्तान आणि दुबई येथे खेळवली जात आहे. पण या स्पर्धेदरम्यान पाकिस्तानला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. गतविजेत्या पाकिस्तान संघाचे आव्हान या स्पर्धेतील यापूर्वीच संपले आहे. त्यातच आता त्यांचा स्टार फलंदाज फखर जमान वनडेतून निवृत्ती घेणार आहे.