

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात कराचीला खेळला जाणार आहे. या दोन संघात काही दिवसांपूर्वीच तिरंगी मालिकेतील अंतिम सामना झाला होता, ज्यात न्यूझीलंडने बाजी मारली होती. पाकिस्तानला त्यांचा दुसरा सामना भारताविरुद्ध खेळायचा आहे.
दरम्यान, पाकिस्तानला आता चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यापूर्वी मोठा दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानचा अनुभवी वेगवान गोलंदाज हॅरीस रौफ ही चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार असल्याचे समजत आहे.