
पाकिस्तान क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच शुक्रवारी (१३ डिसेंबर) अष्टपैलू इमाद वासीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दुसऱ्यांदा निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती.
त्याच्या पाठोपाठ आता वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरनेही दुसऱ्यांदा निवृत्ती घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. हे दोन्ही खेळाडू यावर्षी झालेल्या टी२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत खेळले होते. दोघेही या स्पर्धेत पाकिस्तानसाठी आयर्लंडविरुद्ध अखेरचा सामना खेळले आहेत.