Salman Mirza Says He Will Take Legal Action Over Misconduct Claims
esakal
Salman Mirza Says He Will Take Legal Action Over Misconduct Claims: पाकिस्तानचा गोलंदाज सलमान मिर्झा याने त्याच्यावर झालेल्या आरोपांवर अखेर मौन सोडले आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान श्रीलंकेतील हॉटेलमध्ये एका महिला कर्मचारीशी गैतवर्तन केल्याचा आरोप मिर्झावर लावला गेला, असे वृत्त अनेकांनी प्रसिद्ध केले. पण, आता मिर्झा याने या आरोपांचे खंडन केले आहे आणि आपण असे काहीच न केल्याचा दावा त्याने केला आहे. इतकच नाहीत तर त्याने हे वृत्त प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकार आणि मीडिया कंपनीला कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे.