Arshdeep Singh reacts during practice as Pakistan lodges ICC complaint over his alleged hand gesture.
esakal
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अर्शदीप सिंगच्या हातवाऱ्यावर आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीत अर्शदीपचा इशारा “अश्लील आणि अपमानास्पद” असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याआधी PCB ने सूर्यकुमार यादव आणि सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्टविरोधातही तक्रारी केल्या होत्या.
Arshdeep’s Hand Gesture Sparks ICC Complaint from Pakistan : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) वारंवार तक्रारींचा पाढा वाचताना दिसत आहेत.. भारताकडून दोन वेळा वस्त्रहरण झाल्यानंतरही त्यांना अक्कल येताना दिसत नाही आणि आज त्यांना पुन्हा एकदा माती खायला लावण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. पण, यांची मस्ती काही जात नाहीए आणि त्यांनी सूर्यकुमार यादव, सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यानंतर भारतीय गोलंदाज अर्शदीपस सिंग याच्याविरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे ( ICC) तक्रार दाखल केली आहे.