Pakistan Match Fixing : पाकिस्तानी फिक्सर, इंग्लंड दौऱ्यावर संशयास्पद घडामोडी! फोन जप्त, PCB कडून चौकशी; खूप मोठी नावं अडकणार?

Pakistan match-fixing controversy: पाकिस्तान क्रिकेट पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगच्या सावटाखाली आले आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघात घडलेल्या काही संशयास्पद घडामोडींनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) चौकशी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
England vs Pakistan Test Series

Pakistan Match-Fixing Scandal

esakal

Updated on

Pakistan England match-fixing investigation latest news: पाकिस्तान क्रिकेट संघात फिक्सिंगचं भूत परतले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ यापूर्वी फिक्सिंगमुळे बदनाम झाला होता आणि इंग्लंड दौऱ्यावरही तशीच परिस्थिती उद्बवली आहे. इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटीतील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ७ खेळाडूंना घरी पाठवले. त्यांनी मुख्य प्रशिक्षक सर्फराज अहमद व गोलंदाज प्रशिक्षक उमर गुल यांचीही बत्ती गुल केली. आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे आणि PCB च्या या निर्णयामागे फिक्सिंगचं कारण असल्याचे सांगितले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com