ICC T20 World Cup Pakistan controversy news
esakal
ICC T20 World Cup Pakistan controversy news: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ( PCB ) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आपल्या संघाला खेळायला पाठवायचे आहे, परंतु ते उगाच नाटकं करत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. बांगलादेशच्या हकालपट्टीनंतर पाकिस्तान सरकार व पीसीबी यांनी पाकिस्तानही वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकू शकतो, अशी भूमिका घेतली. स्पर्धा सुरू होण्यास एक आठवडा शिल्लक असतानाही त्यांनी निर्णय जाहीर केलेला नाही. वर्ल्ड कपमधून माघार पाकिस्तान क्रिकेटला महागात पडणारी ठरू शकते, याची जाण असल्याने ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहण्याची शक्यता कमीच आहे. अशात पीसीबीच्या मीडिया मॅनेजरच्या एका 'मेसेज'ने पुन्हा गोंधळ निर्माण केला आहे.