
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या स्पर्धेचे अधिकृत आयोजक आहेत. आता या स्पर्धेसाठी काही दिवसच शिल्लक असताना नव्या वादाला तोंड फुटले होते.
या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याने त्यांचे सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. पण इतर सर्व सहभागी संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार आहेत.