पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाने घरच्या मैदानावर पार पडलेल्या पात्रता स्पर्धेत सलग चौथ्या विजयाची नोंद केली आणि भारतात या वर्षी होणाऱ्या ICC Women's Cricket World Cup 2025 स्पर्धेतील जागा निश्चित केली. पाकिस्तानने पात्रता जरी निश्चित केली असली तरी त्यांचे सामने भारतात होणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा वाद सुरू असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एक करार केला होता. त्यामुळे २०२७ पर्यंत दोन्ही संघ एकमेकांच्या देशात खेळायला जाणार नाहीत.