
पाकिस्तानमध्ये २९ वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धचे यजमानपद मिळाले. चॅम्पियन्स लीग २०२५ या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) लाहोर, रावळपिंडी, कराची येथील स्टेडियम्सच्या नुतनीकरणारासाठी प्रचंड पैसा खर्च केला. भारतीय संघाने या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने त्यांचे सर्व सामने दुबईत खेळवले गेले. पाकिस्तानलाही भारताविरुद्ध खेळण्यासाठी दुबईत जावे लागले. त्यामुळे त्यांनी खूप रडारड केली, परंतु आता स्पर्धा संपल्यानंतर त्यांच्यावर खरंच रडण्याची वेळ आली आहे.