

Pakistan Cricket Team
Sakal
Pakistan’s T20 World Cup Boycott Could Lead Massive Consequences: भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये आयोजित करण्यात आलेली टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा तोंडावर येऊन ठेपली आहे. केवळ १० दिवसांचा कालावधी राहिलेला असताना वादग्रस्त घटना घडताना दिल्या आहेत.
बांगलादेशने (BCB) सुरक्षेचं कारण देत या स्पर्धेसाठी भारतात येण्यास नकार दिला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बांगलादेशसाठी स्पर्धेची दारं बंद करत जागेवर स्कॉटलंटला संधी दिली. यानंतर मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) बांगलादेशची साथ देण्याचा निर्णय घेत टी२० वर्ल्ड कपवर (T20 World Cup 2026) बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे.