

Kane Richardson - Adam Zampa
Sakal
Australia Pacer Kane Richardson Retires: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा ३४ वर्षीय केन रिटर्डसनने निवृ्त्तीचा निर्णय जाहीर केला आहे. १७ वर्षांच्या कारकिर्दीनंतर रिचर्डसनने (Kane Richardson) क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. तो ऑस्ट्रेलियाचा टी२० वर्ल्ड कप विजेता खेळाडूही राहिला आहे.
२०२१ टी२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा तो भाग राहिला आहे.तो बिग बॅश लीगमधीलही (BBL) यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने बिग बॅश लीग २०२५-२६ स्पर्धा संपल्यानंतर त्याच्या निवृत्तीचा (Retirement) निर्णय जाहीर केला.