PAK vs ENG: पाकिस्तानचा पुन्हा फ्लॉप शो; इंग्लंडसमोर पत्त्यांसारखा कोसळला संघ, एक डाव अन् १०३ धावांनी दारुण पराभव, नेमकं कुठे चुकलं?

Pakistan vs England first Test match result at Headingley: हेडिंग्ले कसोटीत पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. इंग्लंडने एक डाव आणि १०३ धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानचा दोन्ही डावांतील फ्लॉप शो नेमका कसा झाला, जाणून घ्या.
PAK vs ENG

PAK vs ENG

esakal

Updated on

Pakistan vs England first Test match result at Headingley: पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. इंग्लंडने पाकिस्तानचा एक डाव आणि १०३ धावांनी पराभव केला.

विशेष म्हणजे, इंग्लंडने एका डावात केलेल्या धावांपर्यंतही पाकिस्तानला आपल्या दोन्ही डावांत मिळून पोहोचता आलं नाही. १९ ऑगस्टपासून सुरू झालेला हा सामना तिसऱ्याच दिवशी म्हणजेच आज २१ ऑगस्टला संपला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com