

Pakistan Cricket Team
Sakal
PAK vs NAM Rain Threat: टी२० वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेतील सुपर -८ फेरीतील आठवा आणि अखेरचा संघ निश्चित होण्यासाठी बुधवारी (१८ फेब्रुवारी) होणारा पाकिस्तान विरुद्ध नामिबिया सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. कोलंबोमध्ये हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यावर पाकिस्तानचे स्पर्धेतील भवितव्य अवलंबून आहे.
नामिबिया यापूर्वीच स्पर्धातून बाहेर झाले आहेत. तसेच नेदरलँड्सलाही पुढच्या फेरीत जाण्याची खूपच कमी संधी आहे. अशात सध्या अ गटातून सुपर ८ मध्ये जाण्यासाठी पाकिस्तान (Pakistan) आणि अमेरिका (USA) या संघात चुरशीची स्पर्धा आहे. या गटातून भारताने आधीच सुपर-८ मधील (Super-8) स्थान पक्के केले आहे.