PCB chief Mohsin Naqvi
esakal
Pakistan unsure against Netherlands and USA : पाकिस्तान क्रिकेट संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांच्या सहभागाबद्दलची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. बांगलादेशच्या जागी वर्ल्ड कप संघात स्कॉटलंडचा समावेश केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची भाषा सुरू केली. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी मंगळवारी पंतप्रधान सेहबाज शरिफ यांची भेट घेतली. आठवडाभरात ते अंतिम निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. संभाव्य राजकीय, कायदेशीर आणि आर्थिक परिणाम लक्षात घेऊन त्यांनी स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचे सर्व पर्याय खुले ठेवले आहेत.