Viral Video : पाकिस्तानचा जाहीर अपमान! पत्रकाराने अफगाणिस्तानला विचारलेला प्रश्न शेजाऱ्यांना जिव्हारी लागला, कर्णधाराचा चेहरा...
पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि यूएई यांच्यातील तिरंगी मालिका आज दुबईत सुरू झाली.
मालिकेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आघाची अडचण उघड झाली.
मालिकेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे.
Pakistani Captain’s Awkward Moment As Afghanistan Praised Over Pakistan : पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती आणि अफगाणिस्तान यांच्यात आजपासून तिरंगी मालिका सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी तिन्ही संघाच्या कर्णधारांची पत्रकार परिषद पार पडली आणि त्यात पाकिस्तानची अप्रत्यक्ष लाज काढण्यात आली. पाकिस्तान क्रिकेट संघातील सावळागोंधळ सर्वांना माहित आहे आणि त्यामुळेच त्यांची कामगिरी खराब होताना दिसतेय. सतत कर्णधार बदल, मुख्य प्रशिक्षक बदल अशी संगीतखुर्ची सुरूच आहे. पाकिस्तानी चाहते त्यांच्या संघाच्या कामगिरीवर नाराज आहेत आणि संघाची खिल्ली उडवतात.