Pakistan’s road to the T20 World Cup 2026 semi-finals
esakal
Cricket
T20 WC : फायनल सोडा, पाकिस्तानचे उपांत्य फेरीत पोहोचणे अवघड झाले; न्यूझीलंडविरुद्धची लढत रद्द झाल्याने गणित बिघडले
Rain Derails Pakistan’s Qualification Scenario: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडविरुद्धचा अत्यंत महत्त्वाचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने गुणतालिकेतील गणित पूर्णपणे बदलले. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला असला, तरी पाकिस्तानसाठी ही परिस्थिती धोक्याची ठरली आहे.
Pakistan qualification scenario after PAK vs NZ no result: पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ चा सामना पावसामुळे रद्द झाला. दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले आणि हा दोन्ही संघांसाठी खूप मोठा धक्का आहे. कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवरील लढतीत पावसाने खोडा घातला आणि फायनलचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानचे उपांत्य फेरीत पोहोचण्याचेही वांदे झालेले दिसत आहेत. आता पाकिस्तानला उपांत्य फेरीत जाण्यासाठी स्वतःसह इतरांच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे.
