BCCI Chief Selector: अजित आगरकरची जागा कोण घेणार? पार्थिव पटेलचा मोठा निर्णय अन् शर्यतीत ट्विस्ट

Major Twist in BCCI Selector Role Search: भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे रिक्त जागेसाठी बीसीसीआयचा शोध सुरू आहे. अशात आता पार्थिव पटेलने मोठा निर्णय घेतला आहे.
Parthiv Patel Opts Out of BCCI Selection Committee Race

Parthiv Patel Opts Out of BCCI Selection Committee Race

Sakal

Updated on: 

BCCI Selection Committee Update : भारतीय निवड समितीत येत्या काही दिवसात मोठा बदल होताना दिसणार आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून ४ ऑक्टोबर रोजी अजित आगरकर (Ajit Agarkar) यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यानंतर बीसीसीआयने त्यांना कायम न करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्यांची जागा रिकामी झाली आहे.

निवड समितीतील एक जागा त्यामुळे रिकामी झाली असल्याने ही जागा भरण्यासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते. हे अर्ज दाखल करण्यासाठी १४ ऑक्टोबर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अंतिम वेळ होता. असे असतानाच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Parthiv Patel Opts Out of BCCI Selection Committee Race
TEAM INDIA SELECTOR : अजित आगरकरांची जागा घेणार कोण? BCCI ने मागवलेत अर्ज; जाणून घ्या काय आहेत अटी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com