Pat Cummins : उस्मान ख्वाजाच्या दाव्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटला हादरवले; कर्णधार पॅट कमिन्सची तातडीची पत्रकार परिषद, म्हणाला, तो माझा मित्र पण...

Pat Cummins response to Usman Khawaja ball-tampering claims: ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये उस्मान ख्वाजाच्या दाव्यांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. बॉल टॅम्परिंगसंदर्भातील ख्वाजाच्या विधानांवर ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Pat Cummins response to Usman Khawaja ball-tampering claims

Pat Cummins response to Usman Khawaja ball-tampering claims

Updated on: 

Pat Cummins calls Khawaja's allegations complete and utter nonsense: ऑस्ट्रेलिया क्रिकेटला हादरवून टाकणाऱ्या बॉल टॅम्परिंग म्हणजे चेंडू कुडतडण्याच्या प्रकरणावर माजी फलंदाज उस्मान ख्वाजाने मोठा दावा केला. चेंडूचा आकार बदलण्यासाठी सँड पेपरचा वापर होणार आहे, याची माहिती संपूर्ण संघाला होती, असा दावा उस्मान ख्वाजाने त्याच्या पुस्तकातून केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट हडबडले आणि कर्णधार पॅट कमिन्सने तातडीने पत्रकार परिषद घेतली. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कमिन्सने पत्रकार परिषद घेत ख्वाजाच्या दाव्यांना 'Complete And Utter Nonsense' असे संबोधले.

Loading content, please wait...