पॅट कमिन्सला पाठीच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकण्याची शक्यता आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी खेळताना त्याच्या दुखापतीत वाढ झाली.
स्कॅनमध्ये दुखापत गंभीर असल्याचे आढळले असून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला जात आहे.
Pat Cummins injury update before India ODI series : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि त्यापूर्वीच कांगारूंना धक्का बसला आहे. भारताविरुद्धच्या या मालिकेला पॅट कमिन्स मुकण्याची शक्यता बळावली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यांदरम्यान उद्भवलेल्या पाठीच्या दुखापतीने त्याला त्रास दिला आहे. त्यामुळेच तो न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० आणि त्यानंतरच्या आठ सामन्यांना तो मुकण्याची शक्यता आहे. २१ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या अॅशेस मालिका डोळ्यासमोर ठेवून कमिन्सला विश्रांती देणेही ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचे आहे.