Record Broken! पंजाब किंग्सने नोंदवली IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्या; प्रियांश आर्य, कूपर कॉनलीसह सारेच लखनौच्या गोलंदाजांवर तुटून पडले...

Punjab Kings highest score IPL 2026 vs LSG full match report: पंजाब किंग्सने आयपीएल २०२६ मधील सर्वाधिक धावसंख्या नोंदवत इतिहास रचला. पहिल्याच षटकात विकेट गमावल्यानंतरही Priyansh Arya आणि Cooper Connolly यांनी दुसऱ्या विकेटसाठी तब्बल १८२ धावांची विक्रमी भागीदारी करत लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांची धुलाई केली.
Priyansh Arya & Cooper Connolly Miss Tons

Priyansh Arya & Cooper Connolly Miss Tons

esakal

Updated on

Punjab Kings vs Lucknow Super Giants marathi Updates: पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील सर्वोच्च धावसंख्या आज उभी केली. लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांची धु धु धूलाई करून PBKS ने धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या षटकात विकेट गेल्यानंतरही प्रियांश आर्य ( Priyansh Arya ) व कूपर कॉनली ( Cooper Connolly ) यांच्या १८२ धावांच्या विक्रमी भागीदारीने LSG च्या गोलंदाजांना हतबल केले. त्यामुळेच जेव्हा हे दोन्ही फलंदाज बाद झाले, तेव्हा मालक संजीव गोएंका यांनी देवाचे आभार मानत छातीवर हात ठेवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com