PBKS vs MI Live : १४ चेंडूंत ४ विकेट्स! शार्दूल ठाकूरचा भन्नाट मारा... श्रेयस अय्यर आला तसा गेला, जसप्रीतचा डाव यशस्वी; Video

IPL 2026 PBKS vs MI Marathi Cricket News: धर्मशालामध्ये सुरू असलेल्या पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात शार्दूल ठाकूरने भन्नाट गोलंदाजी करत सामना पूर्णपणे मुंबईच्या बाजूने झुकवला. अवघ्या ८ चेंडूंमध्ये तीन विकेट्स घेत त्याने पंजाबच्या फलंदाजीला जबर धक्का दिला.
Shardul Thakur produced a sensational spell against Punjab Kings in IPL 2026

Shardul Thakur produced a sensational spell against Punjab Kings in IPL 2026

esakal

Updated on

Punjab Kings vs Mumbai Indians Marathi Updates : पंजाब किंग्सच्या आक्रमक फलंदाजांना शांत ठेवण्यात मुंबई इंडियन्सला यश आले... प्रियांश आर्या, प्रभसिमनर सिंग व कूपर कॉनली या आक्रमक फलंदाजांना अपेक्षित फटकेबाजी करता आली नाही. त्यात शार्दूल ठाकूरला ( Shardul Thakur) पुन्हा गोलंदाजीला आणण्याचा कर्णधार जसप्रीत बुमराहचा डाव यशस्वी ठरला. त्याने तीन चेंडूंत पंजाबच्या दोन स्टार फलंदाजांना माघारी पाठवले. श्रेयस अय्यरचा त्रिफळा कसा उडाला, हे पंजाबच्या चाहत्यांना नाही समजले.. त्यात राज बावानेही झटका दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com