Jasprit Bumrah to captain Mumbai Indians for first time
esakal
Jasprit Bumrah to captain Mumbai Indians for first time: हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्या गैरहजेरीत मुंबई इंडियन्स नव्या कर्णधारासह पंजाब किंग्सचा सामना करायला मैदानावर उतरला. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील MI चे आव्हान संपुष्टात आले आहे आणि मागील दोन सामन्यांत हार्दिकला पाठीच्या दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. त्याने PBKS विरुद्धच्या लढतीपूर्वी सरावाचा Video पोस्ट केला खरा, पंरतु आजच्या लढतीत खेळण्यासाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही. त्यात नुकताच बाबा झालेला सूर्यालाही धर्मशाला येथे होणाऱ्या लढतीला मुकावे लागले आहे.