

IPL 2026 Punjab Kings vs Gujarat Titans Marathi Updates
esakal
IPL 2026 Punjab Kings vs Gujarat Titans Marathi Updates : ट्वेंटी-२० क्रिकेटमधील दोन तगडे फलंदाज श्रेयस अय्यर व शुभमन गिल, आज समोरासमोर येणार आहे. मुळचा पंजाबचा गिल आज पंजाब किंग्सविरुद्ध खेळणार आहे आणि तो गुजरात टायनटन्सचे नेतृत्व करतोय. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या तोंडावर खराब फॉर्मामुळे गिलने भारतीय संघातील स्थान गमावले होते आणि ही इंडियन प्रीमिअर लीग २०२६ त्याच्यासाठी ट्वेंटी-२०तील आपली ताकद दाखवण्याची संधी आहे. PBKS चा कर्णधार श्रेयस ट्वेंटी-२०त जबरदस्त खेळतोय, परंतु भारतीय संघात त्याच्यासाठी जागाच नाही. तो ही जागा निर्माण करण्यासाठी खेळेल.