PCB Chief Mohsin Naqvi faces backlash after Cristiano Ronaldo plane post amid India vs Pakistan controversy
esakal
ICC action on PCB Chief Mohsin Naqvi’s provocative post : आशिया क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसिन नक्वी यांची नवी पोस्ट चर्चेत आली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सामन्यात खूप मोठे वाद झाले... भारतीय खेळाडूंनी पहिल्या सामन्यात हस्तांदोलन न करून पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बहिष्काराची पोकळ धमकी देत आयसीसीकडे सामनाधिकारी अँड पायक्रॉफ्ट व कर्णधार सूर्यकुमार यादव यांची आयसीसीकडे तक्रार केली. पण, आयसीसीने भीक न घातल्याने सुपर ४ च्या लढतीत पाकिस्तानींनी माकड चाळे केले. आता त्यात नक्वींनी जगातील सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला ओढलं आहे.