

PCB Clarifies T20 World Cup Stance After Speculation: बांगलादेश क्रिकेट बोर्डाला ( BCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) २१ जानेवारीपर्यंतची शेवटची मुदत दिली आहे. मुस्ताफिजूर रहमान प्रकरणावरून बीसीबीने भारतात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने खेळण्यास नकार दिला आहे. आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्यासाठी दोन अधिकारीही ढाका येथे पाठवले, परंतु त्यांनी हट्टीपणा सोडलेला नाही. त्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही ( PCB) बांगलादेशचं ऐकलं नाही, तर आम्हीपण खेळणार नाही, अशी धमकी दिल्याचे वृत्त पाकिस्तानी मीडियाने प्रसिद्ध केले होते. पण, आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी बीसीबीला नकार दिला अन् आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डही वठवणीवर आलं आहे.