

BABAR AZAM, FAKHAR ZAMAN UNDER INVESTIGATION
esakal
Pakistan cricket controversy after T20 World Cup exit: पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम आणि फखर जमान यांच्यावर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संकटं ओढावली आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाला वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयश आले. त्यांना सुपर ८ मध्ये इंग्लंडकडून हार पत्करावी लागली आणि न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता.
बाबर आझम आणि फखर जमान हे दोघंही वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघाचे सदस्य होते आणि हे दोघंही दुखापत असतानाही खेळले. त्यामुळेच वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीवर परिणाम झाला. पाकिस्तानच्या या दोन्ही फलंदाजांनी वर्ल्ड कपनंतर होणाऱ्या नॅशनल ट्वेंटी-२० अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्यास नकार दिल्यानंतर, सर्व प्रकरण उघडकीस आले.