Pakistan Cricket Board reportedly warns Shadab Khan to stay within limits
esakal
PCB reaction to Shadab Khan comments on Pakistan legends: पाकिस्तान क्रिकेटचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे. भारताविरुद्ध पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच्या संघावर आणि खेळाडूंवर माजी दिग्गजांकडून बोचऱ्या शब्दात टीका झाली. त्याला ऑल राऊंडर शादाब खान याने सडेतोड उत्तर दिले. आम्ही आयसीसी स्पर्धेत किमान भारताला एकदा पराभूत केले, तुम्हाला तेही जमले नाही, अशी टीका शादाबने माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी, मोहम्मद युसूफ यांचे नाव न घेता केली. पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB ) शादाबच्या या विधानावर नाराज असल्याचे वृत्त समोर आले आहे आणि त्यांनी शादाबला तोंडाला लगाम लाव असा दम दिला आहे.