Bangladesh could be back in the T20 World Cup
esakal
T20 World Cup Bangladesh comeback news: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सध्या संगीत खुर्चीचा खेळ सुरू असल्याचे दिसत आहेत. बांगलादेशने भारतात ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचे सामने खेळण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केला. बांगलादेशच्या समर्थनात पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB ) उभे राहिले आणि आता ते बहिष्काराची भाषा करत आहेत. पीसीबीचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी काल यासंदर्भात पाकिस्तानी पंतप्रधानांची भेट घेतली. येत्या शुक्रवारी ते त्यांचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. पण, पाकिस्तानचा हा डाव आता त्यांच्यावर उलटणार असल्याचे दिसतेय..