प्रो कबड्डी लीगमध्ये यु मुंबाने तमिळ थलायवाजवर ३६-३३ ने विजय मिळवला. अजित चौहान आणि अनिल मोहन सिंग यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे यु मुंबाने शेवटच्या मिनिटात सामना जिंकला.यु मुंबाने सलग दुसरा विजय नोंदवला आहे..प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील पाचवा सामना तमिळ थलायवाज आणि यु मुंबा या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दोन्ही संघांनी आपल्या पहिल्या सामन्यात विजयी सलामी दिली होती. त्यामुळे दोन्ही संघ आपला दुसरा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरले होते. रम्यान या सामन्यात यु मुंबाकडून अजित चौहान आणि अनिल मोहन सिंग यांनी दमदार कामगिरी केली. यासह शेवटच्या मिनिटाला निकाल लागलेल्या या सामन्यात यु मुंबाने तमिळ थलायवाजवर ३६-३३ ने दमदार विजय नोंदवला.यु मुंबाकडून चढाई करताना अजित चौहानने सर्वाधिक ९ गुणांची कमाई केली. तर अनिल मोहन सिंगने ८ गुणांची कमाई केली. लोकेश घोसलिया ४ आणि रिंकू शर्माने देखील ४ गुणांची कमाई केली. तमिळ थलायवाजकडून अर्जून देशवालने सुपर १० पूर्ण करत १२ गुणांची कमाई केली. या सामन्याच्या सुरूवातीला यु मुंबाकडून अजित चौहानने पहिल्याच चढाईत १ गुण घेत यु मुंबाला खातं उघडून दिलं. .Vishal Tate Exclusive: शाळेतल्या सरांमुळे कबड्डीची सुरुवात करणारा नांदेडचा विशाल PKL चं मैदान गाजवण्यास सज्ज; वाचा त्याचा प्रवास.तमिळ थलायवाजकडून पवन सेहरावत चढाईला आला, पण यु मुंबाने त्याची यशस्वी पकड केली. सामन्यातील चौथ्या मिनिटाला तमिळ थलायवाजने डू ओर डाय रेडमध्ये रोहित राघवची पकड केली आणि संघाचं खातं उघडलं.पुर्वार्धातील सुरूवातीच्या ५ मिनिटात यु मुंबाचा संघ ४-३ ने आघाडीवर होता. यु मुंबाने पवन सेहरावतला सुरूवातीलाच बाहेर बसवलं होतं.पण तो कोटवर परतल्यानंतर त्याने तमिळ थलायवाजला आघाडी मिळवून दिली. पुर्वार्धातील १० मिनिटांचा खेळ संपल्यानंतर तमिळ थलायवाजकडे ७-५ गुणांसह २ गुणांची आघाडी होती. पूर्वार्धातील शेवटची ५ मिनिटे शिल्लक असताना तमिळ थलायवाजकडे ५ गुणांची आघाडी होती..यु मुंबाचा संघ ऑल आऊट होण्याच्या वाटेवर होता. पण नेमकं तेव्हाच अनिल मोहनने बोनस आणि १ असे २ गुण घेत संघाला ऑलआऊट होण्यापासून वाचवलं. त्यानंतर पुढच्या चढाईत यु मुंबाने सुपर टॅकल करत संघाला आणखी २ गुणांची कमाई करून दिली. पुर्वार्धापर्यंत तमिळ थलायवाजने यु मुंबावर १४-११ अशी ३ गुणांची आघाडी घेतली. पूर्वार्धातील शेवटच्या मिनिटाला यु मुंबाकडून रिंकू नरवाल एकटाच कोटवर शिल्लक होता.उत्तरार्धातील पहिल्याच चढाईत रिंकूने पवन सेहरावतला १ गुण भेट म्हणून दिला. यासह यु मुंबावर पहिला लोन चढला. त्यामुळे तमिळ थलायवाजला ३ गुण मिळाले. त्यानंतर अजित चौहानने दमदार सुरूवात करत २ गुणांची कमाई केली. तमिळ थलायवाजच्या बचावात चांगलाच ताळमेळ दिसून येत होता, तर यु मुंबाकडून हवा तसा बचाव होत नव्हता. पण यु मुंबाला पवन सेहरावतला जास्तीत जास्त वेळ बाहेर बसवण्यात यश आलं..उत्तरार्धातील सुरूवातीच्या ५ व्या मिनिटापर्यंत तमिळ थलायवाजचा संघ २१-१७ गुणांसह ६ गुणांनी आघाडीवर होता. यु मुंबाचे चढाईपटू खूप आत जाऊन गुण घेण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे तमिळ थलायवाजच्या बचावपटूंनी संयम ठेवून त्यांची यशस्वी पकड केली आणि हेच तमिळ थलायवाजकडे आघाडी असण्याचं कारण ठरलं.उत्तरार्धातील शेवटची १० मिनिटे शिल्लक असताना यु मुंबाचा संघ दुसऱ्यांदा ऑलआऊट होण्याच्या उंबरठ्यावर होता. पण सतिशने बोनस आणि १ गुण घेत संघाला ऑल आऊट होण्यापासून वाचवलं. तमिळ थलायवाजकडे २८-२० अशी ८ गुणांची आघाडी होती. त्यानंतर अजित चौहानने बोनस आणि १ गुण घेत आघाडी कमी केली..PKL 2025: कुस्ती खेळताय की कबड्डी? यू मुम्बाच्या कर्णधाराने गुजरातच्या खेळाडूला केलं चीतपट; Video Viral.पुढच्याच चढाईत यु मुंबाच्या बचावपटूंनी सुपर टॅकल करत आघाडी आणखी कमी केली. शेवटची ८ मिनिटे शिल्लक असताना तमिळ थलायवाजकडे ३ गुणांची आघाडी होती. सामन्यातील शेवटची ४ मिनिटे शिल्लक असताना यु मुंबाने गुण २८-२८ ने बरोबरीत आणले. त्यानंतर यु मुंबाने तमिळ थलायवाजवर पहिला लोन चढवत २९- ३१ अशी २ गुणांची महत्वाची आघाडी घेतली.शेवटच्या ५ मिनिटात यु मुंबाने १० हून गुणांची कमाई केली. शेवटची २ मिनिटे शिल्लक असताना यु मुंबाकडे ३२-३१ अशी १ गुणाची आघाडी होती. शेवटच्या मिनिटाला यु मुंबाला २ गुणांची आघाडी मिळाली होती. शेवटच्या चढाईत १ गुण घेत यु मुंबाने हा सामना ३६-३३ ने जिंकला.या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात तमिळ थलायवाजने ३८-३५ ने विजय मिळवत संघाचं खातं उघडलं होतं. तर दुसरीकडे सुनील कुमारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या यु मुंबाने गुजरात जायटंस् संघाचा टायब्रेकरमध्ये ६-५ ने बाजी मारत पहिला विजय मिळवला. आता तमिळ थलायवाजला पराभूत करत यु मुंबाने सलग दुसरा विजय मिळवला आहे..FAQs१. यु मुंबा विरुद्ध तमिळ थलायवाज सामना कोण जिंकला?➤ यु मुंबाने ३६-३३ असा निसटता विजय मिळवला.(Who won the U Mumba vs Tamil Thalaivas match?)२. यु मुंबासाठी सर्वाधिक गुण कोणी मिळवले?➤ अजित चौहानने सर्वाधिक ९ गुण मिळवले.(Who scored the most points for U Mumba?)३. तमिळ थलायवाजसाठी सुपर १० कोणी पूर्ण केलं?➤ अर्जुन देशवालने सुपर १० पूर्ण करत १२ गुणांची कमाई केली.(Who completed the Super 10 for Tamil Thalaivas?)४. यु मुंबाने या स्पर्धेत किती सामने जिंकले आहेत?➤ यु मुंबाने आतापर्यंत सलग २ विजय मिळवले आहेत.(How many matches has U Mumba won so far? → 2 consecutive wins.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.