

Rinku Singh
Sakal
Police Complaint Filed Against Rinku Singh by Karni Sena: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रिंकू सिंग सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघासोबत तयारी करत आहे. मात्र असे असतानाच त्याच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
त्याने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या AI व्हिडिओमुळे (Video) तो संकटात सापडला आहे. त्याच्याविरुद्ध अलिगढमधील करणी सेनेकडून (Karni Sena) पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.