भारतीय संघातून वगळले, म्हणून Rinku Singh पेटला! २४० च्या स्ट्राईक रेटने स्फोटक खेळी; समीर रिझवी, माधव कौशिक यांचेही अर्धशतक

Rinku Singh’s Explosive Innings Powers UP : उत्तर प्रदेशने चंदीगडवर तब्बल ४० धावांनी विजय मिळवला. या विजयाचा केंद्रबिंदू ठरला रिंकू सिंगचा स्फोटक तडाखा. भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे चर्चेत असलेल्या रिंकूने आपल्या खेळातून पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली.
Rinku Singh smashed at a 240 strike rate in SMAT 2025

Rinku Singh smashed at a 240 strike rate in SMAT 2025

esakal

Updated on

Rinku Singh smashed at a 240 strike rate in SMAT 2025 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० सामन्यांसाठी BCCI ने कालच भारतीय संघाची घोषणा केली. या संघात रिंकू सिंगचे नाव नसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मागील काही वर्षापासून रिंकूला टीम इंडियाचा फिनिशर म्हणून ओळखले जातेय. पण, आफ्रिकाविरुद्ध त्याची निवड न झाल्याने त्याचे चाहते नाराज झाले. मात्र, रिंकूने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेत आपल्या खेळीने याला उत्तर दिले. उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या रिंकूने आज चंडिगढविरुद्ध २४० च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com