टीम इंडियात निवड नाही झाली, पठ्ठ्याने सर्व राग गोलंदाजांवर काढला... २२ चेंडूंत १०४ धावांचा पाऊस पाडला; अभिषेक, नमनची खेळी व्यर्थ

Prabhsimran Singh 125 not out off 47 balls: टीम इंडियाच्या निवडीत स्थान न मिळाल्यानंतर प्रभसिमरन सिंगने मैदानावर आपल्या बॅटने जोरदार उत्तर दिले आहे. शेर-ए-पंजाब ट्वेंटी-२० लीगमध्ये जालंधर वॉरियर्सकडून खेळताना प्रभसिमरनने गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.
Shere-E-Punjab T20 League

Prabhsimran Singh 125 Jalandhar Warriors Shere-E-Punjab T20 League

esakal

Updated on

Abhishek Sharma and Naman Dhir innings in Shere-E-Punjab T20 League: अभिषेक शर्माची आणखी एक वादळी खेळी व्यर्थ गेली. शेर ए पंजाब ट्वेंटी-२० लीगमध्ये अमृतसर सूरमा संघाला मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. नमन धीरच्या शतकावरही पाणी फेरले गेले, कारण सातत्यपूर्ण कामगिरी करूनही भारतीय संघात स्थान न मिळालेल्या प्रभसिमरन सिंगने ( Prabhsimran Singh ) वादळी खेळी केली. जालंधर वॉरियर्सने २६५ धावांचे लक्ष्य ८ विकेट्स व १९ चेंडू राखून पार केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com